श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालं ओम्कारममलेश्वरम् ॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥

वारणस्यां तु विश्र्वेशं त्रयंम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घृश्नेशं च शिवालये ॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥

मंदिराचा इतिहास

त्रेतायुगा मध्ये त्रिपुरासुर नावाचा दैत्य होता .त्याने भगवान शंकराची आराधना करून त्याने त्याच्या अमरात्वाचे वरदान शंकराला मागितले . भगवान शंकरांने त्याला वर दिला कि तुझा कोणताही नर अथवा नारी वध करू शकनार नाही. शंकराच्या वरदाना मुळे तो तिन्ही लोकात ( पृथ्वी , स्वर्ग ,पाताळ ) उन्मत्त होऊन देवगणा सहित मानव जातीला त्रास देऊ लागला. असे बराच काळ चालले. देवगणा सहित सगळे, भगवान शंकरांना शरण आले . भगवान शंकर क्रोधीत झाले आणि त्रिपुरासुराचा संहार करण्याचा निश्चय केला.या साठी रथ तयार करण्यात आला 4 वेदांचे प्रतिक म्हणून चार खांब , चंद्र , सूर्य यांची चाके , शेष नागाचा धनुष्य , आणि बाणावर विष्णू असा हा रथ घेऊन भगवान शंकर कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी पृथ्वीतलावर अवतरीत झाले . याचे विश्लेषण खालील श्लोकात केले आहे.

ब्रम्हा , विष्णू , महेश , यांनी मिळून पंचतत्त्व ( जल , वायू ,आकाश ,पाताळ ,पृथ्वी ) एकत्र करून श्री आदिमाया आदिशक्ती पार्वती यांची कमल पुष्पांनी आराधना केली. कमल पुष्पातून पार्वती चे आवाहन करण्यात आले . हे पार्वतीचे वास्तव्य आजही भीमाशंकर क्षेत्रात आहे . या आदिशक्तीस "कमलजा माता" या नावाने ओळखळे जाते. भगवान शंकर आणि आदिमाया पार्वती यांनी एकत्रित होऊन अर्धनारी रूप धारण केले . असे अर्धनारी रूप धारण करून भीमरूपात (महाकाय रूप) त्रिपुरासुराचा वध कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी केला.

हे युद्ध कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा असे होऊन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला. देवांना परिश्रम झाले असल्याने विश्रांती साठी ते बसले असता देवाच्या शरीरातून प्रचंड अश्या स्वरूपात घामाच्या धारा निघायला लागल्या होत्या तेथूनच भीमा नदी चा उगम झाला तो आजही प्रवाहित आहे. त्या वेळेस देवगणानी भगवान शंकरांना विनंती केली आपण सर्व , मानव जातीच्या कल्याण साठी येथेच विराजमान व्हावे. हि विनंती मान्य करत भगवान शंकरानी स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात तेथे निवास केला .त्रिपुरा सुराचा वध झाल्यानंतर त्याच्या दोन भार्या शाकिनी व डाकिनी देवांना शरण आल्या. शंकरानी त्यांना वरदान दिले माझ्या नावाच्या आधी तुमचे नाव लागेन . म्हणून "डाकिण्याम भीमशंकरम " असे श्लोकात वर्णन आहे . ज्योतिर्लिंग म्हणजेच ज्योती स्वरूप स्वयं शिव जेथे आजही भगवान शंकर विराजमान आहेत . कार्तिक पौर्णिमा या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाल्याने आजही भव्य दिव्य असा उत्सव साजरा केला जातो .

|| रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो ।
रथाङ्गे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः शर इति ।

दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बर विधिः विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः ||

|| यं डाकिनी शाकिनी का समाजे निषेव्य माण पिशीता शनेश्च |
सदैव भिमादि पद प्रसिद्धम् तम शंकरम भक्ती हितं नमामि ||

भिमशंकरच्या मंदिरात

  • भीमाशंकर मंदिर चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे आज अस्तित्वात असलेली वास्तू म्हणजे जुनया मंदिराच्या जीर्णोध्दारातून निर्माण केलेली आहे. मंदिर सुमारे ३.५ मीटर रुंद आणि अंदाजे १५ मीटर लांबीचे आहे.
  • भीमाशंकर मंदिराच्या बांधकामाच्या शैलीला सामान्यत : हेमाड पंती मंदिर म्हटले जाते. पण ही उभारणी मुख्यतः उत्तरेकडील बांधणीशी अधिक मिळती जुळती आहे. अठराव्या शतकात अनेक मराठा सरदारांनी उत्तर भारतात विशेषतः राजस्थान, माळवा, भागात आपला अंमल बसवला होता. तिथुन त्यांनी वास्तुशिलपाचे तंत्र महाराष्ट्रात आणली.
  • बहुतेक शिवमंदिराची प्रथा अशी की गर्भगृहाची पातळी भूपृष्ठपातळीपेक्षा खाली असते. भीमाशंकरचे गर्भगृह याच प्रकारचे आहे. पाच पायऱ्या उतरुन गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गर्भगृहावर माळवा पध्दतीचे शिखर आहे. या पध्दतीच्या शिखरावर मूळ शिवराच्याच छोटया प्रतिकृती चारही दिशांना बांधलेल्या आहेत.
  • मराठी राज्यकर्त्यांनी भीमाशंकराची आराधना करण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आली आहे. महाराजांनी खरोशी हे गाव देवाला आणि त्या गावाच्या महसूलातून देवाचा खर्च केला जात असे. पेशव्यांनी तीच पध्दत पुढे चालू ठेवली.
  • मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे. आणि त्यात चुन्याचा वापर नाही. हे दगड घडीव, ताशीव आहेत व त्यासाठी स्थानिक खडकच उपयोगात आणला आहे.
  • भिमाशंकर हे ज्योतिर्लिंग शिवलिंग स्वयंभू आहे ७५ सें. मी रुंद व १०० से. मी. लांब आहे.
  • श्री भीमाशंकर मंदिर हे बस स्थानका पासून १ किमी अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी २०० पायऱ्या उतरून जावे लागते .मंदिरात आल्यावर सभामंडपात भगवान विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार “कूर्म अवतार” म्हणजेच कासव आहे. शिवलिंगाच्या समोरच नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना डावीकडे गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती आहे व उजवी कडे देवाचे रक्षक “श्री कालभैरव” यांची मूर्ती आहे. गाभाऱ्यात गेल्यावर पवित्र शिवलिंग विराजमान आहे. शिवलिंगामध्ये एक उभा छेद आहे . यामध्ये एककीकडे शिव एका बाजूस शक्ती असे दोन भाग आहेत. गाभार्यामध्ये समोरील बाजूस पार्वती देवीची मूर्ती आहे .
  • ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 1212 मध्ये झाला होता. मंदिराच्या रचने मध्ये प्रामुख्याने दोन प्रकारात बांधकाम झालेले दिसून येते. मंदिराच्या पाया पासून छता पर्यंत चे काम चुना व माती न वापरता झालेले आहे , तर कळसाचे काम हेमाडपंथी आहे. तसेच गाभाऱ्याचे प्रवेश द्वार हेमाडपंथी रचनेमधील आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर श्री कृष्णाची मूर्ती आहे. पश्चिमेस हमुमानाची मूर्ती व उत्तरेस श्री महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे . मंदिराच्या भिंती वर हृशिमुनिंच्या मूर्ती कोरल्या आहेत. शिखर व कळसावर वेगवेगळ्या मूर्ती आहेत . मंदिराचे शिखर आतुन पूर्णपणे पोकळ आहे . मंदिराच्या समोरील सभामंडपाचे काम 1962 साली करण्यात आले आहे . सभामंडपाच्या समोर शनी चे मंदिर आहे . शनी मंदिराला लागून दगडी दीपमाळ आहे

दैनिक पूजा / कार्यक्रम

वेळकार्यक्रम
सकाळी 05:00 वाजतामंदिर उघडते
प्रातः 05:00 – प्रातः 05:30पूजाविधी
प्रातः 05:30 - दोपहर 12:00 बजे तकदर्शन आणि अभिषेक
दोपहर 12:00 बजे - 12:20 बजेनैवेद्यम पूजा (अर्पण)
दोपहर 12:20 - 02:45 बजेदर्शन आणि अभिषेक
02:45 अपराह्न – 03:20 अपराह्नपूजाविधी
03:20 pm – 07:30 pmदर्शन
07:30 अपराह्न – 08:00 अपराह्नपूजाविधी
08:00 अपराह्न – 09:30 अपराह्नदर्शन
रात्रि 09:30 बजेमंदिर बंद

गैलरी

मराठी